तुला सांगितलं होतं वेळेवर यायला…

तुला सांगितलं होतं वेळेवर यायला…
तुला सांगितला होतं.मुसळधार पडायला…
तू आला नाहीसच…

अरे अंगाची काहिली होतेय…मन तर कोरंच झालाय…
कागदासारखा..कागदावरून आठवल…
शब्दांचं मळभ मनात साठवलं…
तेव्हा बाहेर जरास डोकावून बघितलं…
अरे तू ही भरून राहिला आहेस कि…
जरासा गारवा निर्माण झालाय कि…
ज्या दिशेने येतोस…तिथूनच यायला लागला आहेस…

लवकर ये…
ये पावसा ये…धिंगाणा घालत ये…
अंगणी भिजत ये… मनात रुजत ये…
भन्नाट वाऱ्यासवे ये… सुसाट थेंबासवे ये…

~ अखिल जोशी