Tag: Konkan

 • कोकण दुर्गयात्रा – भरतगड, भगवंतगड, देवगड

  सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावर खेळलेल्या जातिवंत भटक्यांना डोंगर चढ-उतर केल्याशिवाय ट्रेकिंग ची मजाच येत नाही. आमचेसुद्धा तसेच झाले होते. कोकणाच्या दुर्गयात्रेसाठी आलो असलो तरी जवळपासचे डोंगरी किल्लेसुद्धा साद घालत होते. म्हणूनच आमच्या या दुर्गयात्रेमध्ये दोन डोंगरी किल्ले जोडले. भरतगड आणि भगवंतगड. मालवण पासून फक्त १६ किमी अंतरावर असलेली ही दुर्गजोडी पाहणे म्हणजे भटक्यांना एक पर्वणीच ठरते.

 • कोकण दुर्गयात्रा – निवती, सिंधुदुर्ग

  भल्या पहाटे जाग आली ती एका कोकणी म्हातार्‍याच्या बडबडीने आणि शेजारी उभ्या असलेल्या येष्टी च्या घरघर ने. निवती गावातील माणसे जशी जागी होऊ लागली तसे त्यांचे कुतुहल सुद्धा जागे होऊ लागले… घार जशी आपल्या सावजा भोवती घिरट्या मारते तसे एकेक गावकरी येऊन आमच्या तंबू भोवती घिरट्या मारत होता… कोण, कुठले, कशासाठी आला वगैरे प्रश्न वाढायच्या […]

 • कोकण दुर्गयात्रा – तेरेखोल, रेडी, वेंगुर्ला

  सकाळची १०:३० ची वेळ. चार दुर्गयात्री तेरेखोलच्या खाडीवर फेरीची वाट पाहत उभे होते. आधीच एक दिवस उशीर झाला असल्याने फेरीला केरीमच्या धक्क्यावर येताना होणारा उशीर पाहून आमची घालमेल होत होती. काही करून आज तेरेखोल आणि रेडीचा यशवंतगड पाहून मुक्कामी निवती गाठायची होती. तरच आखलेली मोहीम आटोक्यात येणार होती. तुमच्या लक्षात आले असेलच हे दुर्गयात्री कोण होते […]

 • कोकण दुर्गयात्रा

  आम्ही ट्रेक कसे ठरवतो हे आत्तापर्यंत तुम्हाला माहित झाले असेलच परंतु हा ट्रेक (खरेतर दुर्गयात्रा) आधीच ठरली होती. मागच्या महिन्यातील जावळी मोहिमेतच पुढचा ट्रेक सी लेवलला करायचा ठरले होते. त्याला फक्त एक आखीव रेखीव स्वरूप देणे बाकी होते. आणि ते काम दोन मिशीवाल्यांनी (एक वारज्याची आणि एक खराडीची) हाती घेतले होते. आंबेगाव बुद्रुकचे “राजकुमार काकडे” सी […]